Tuesday, July 1, 2025
Homeक्राईम न्यूजइन्स्टाग्रामवर फेक आयडीद्वारे विवाहित महिलेची बदनामी; लष्कर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

इन्स्टाग्रामवर फेक आयडीद्वारे विवाहित महिलेची बदनामी; लष्कर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक घटना समोर आली आहे. येथे इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार करून एका अनोळखी व्यक्तीने एका विवाहित महिलेची ऑनलाईन बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका २७ वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात आरोपीने एका विवाहित महिलेचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. त्यानंतर या अकाउंटवरून आरोपी पीडित महिलेच्या मूळ अकाउंटवर अश्लील संदेश आणि फोटो पाठवले तसेच, आरोपी फिर्यादी महिलेला टॅग करून स्टॉक करत आहे आणि तिच्या नातेवाईकांना तसेच पतीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मेसेजेस पाठवत आहे. आरोपीने फिर्यादी महिलेचे फोटो पाठवून व त्यांना टॅग करून तिची बदनामी केली आहे.

दिलेल्या तक्रारीत म्हम्हटले आहे की, अश्लील मेसेज पाठवून आरोपीने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी लष्कर पोलिसांत गुन्हा नोंदविला असून पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments