इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
भिगवण (वार्ताहर) ता. 23: सायकल चालविल्याने रोगमुक्त वतणावमुक्त जीवनशैली जगता येऊ शकते त्यामुळे निरोगी आरोग्याचा संदेश घेऊन येथील सायकल क्लबच्या सायकप्रेमींनी भिगवण ते पंढरपूर अशी ११० किमीची सायकल वारी पूर्ण केली. यावेळी त्यांनी मार्गावर भेटलेल्या लोकांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. हा वेगळा आणि खूपच आनंददायी अनुभव असल्याचेही या सायकलपटूंनी सांगितले.
पंढरपूर वारीत सायकल चालवत पर्यावरण जागृतीचा संदेश त्यांनी यावेळी प्रत्येकापर्यंत पोहोचवला गेल्या अनेक वर्षांपासून येथील क्लबकडून सायकल वारीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी आम्ही सातत्यपूर्ण सायकल चालवण्याचा सराव करत होतो. वारी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून आमचे स्वागत, पाहुणचार करण्यात आला. आम्हीही या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले, अशी माहिती क्लबचे प्रमुख केशव भापकर यांनी दिली.
सायकल वारीमध्ये डॉ. संकेत मोरे, डॉ. अमित खानावरे, केशव भापकर, संतोष दाताळ, कुंडलिक भांडवलकर, अर्जुन तोडेकर, धनाजी नलावडे हे सहभागी झाले होते.