Monday, July 7, 2025
Homeक्राईम न्यूजपालखी सोहळ्यानिमित्त ड्रोन कॅमेऱ्यांवर बंदी; २० ते २३ जून दरम्यान वापरण्यास मनाई

पालखी सोहळ्यानिमित्त ड्रोन कॅमेऱ्यांवर बंदी; २० ते २३ जून दरम्यान वापरण्यास मनाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेसाठी कंबर कसली आहे. या पवित्र सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, पुणे शहर परिसरात २० ते २३ जून या कालावधीत ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पालखी सोहळ्याच्या मार्गावर आणि परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांचा गैरवापर होण्याची किंवा अनधिकृतपणे संवेदनशील भागांचे चित्रीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी अनुचित प्रकार रोखण्यासाठी काहींना पाळत ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचेही पुणे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष लेखी परवानगी घेतलेल्या व्यक्ती किंवा संस्थांनाच ड्रोन वापरण्याची मुभा असणार असून या व्यतिरिक्त कोणीही ड्रोनचा वापर केल्यास, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पुणे पोलिसांनी सर्व नागरिकांना आणि आयोजकांना या नियमाचे पालन करून पालखी सोहळा सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय

शहर पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. ड्रोन कॅमेऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊनच पोलिसांनी हा प्रतिबंधात्मक उपाय लागू केला आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि सोहळ्याचे पावित्र्य जपण्याचा हा प्रयत्न आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments