इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा एक लाख रुपयांचा टप्पा गाठल्यानंतर, आज सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचे दिसून आले आहे. २४ कॅरेट सोन्याने एक लाखाचा टप्पा पार केला असला तरी, आता दरात घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, चांदीच्या किमतीत मात्र वाढ झाली आहे. आज २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९३,०४० रुपये या दराने विकले जात आहे. तर, शुद्ध २४ कॅरेट सोन्यासाठी १,०१,६७० रुपये प्रति १० ग्रॅमसाठी मोजावे लागत आहे. या घसरणीमुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, सोन्याचे दर अजूनही चढेच आहे.
चांदीने मात्र आज आपली चमक कायम ठेवली आहे. चांदीचा दर १,०१,५०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. हा दर कालच्या तुलनेत वाढलेला आहे.
सोन्याच्या दागिन्यांच्या किमती राज्य कर, उत्पादन शुल्क आणि मेकिंग चार्जेसनुसार बदलतात. दागिन्यांसाठी मुख्यतः २२ कॅरेट सोने वापरले जाते, तर काही वेळा १८ कॅरेट सोन्याचाही वापर होतो. येत्या काळात सोन्या-चांदीच्या दरात काय बदल होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि स्थानिक मागणीचा या दरांवर सध्या परिणाम होत आहे.