Saturday, June 7, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय तस्करी उघड ! 10 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त;...

पुण्यात अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय तस्करी उघड ! 10 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; डीआरआय पुणे युनिटची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यात अंमली पदार्थांचं आंतरराष्ट्रीय तस्करीच प्रकरण उघडकीस आलं आहे. बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांकडून तसेच या प्रवाश्यांच्या मुंबईतील साथीदाराकडून 10 कोटी 30 लाख रुपये किंमतीचा चरस आणि गांजाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे युनिटने केली. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, अंमली पदार्थांच्या तस्करी बाबत महसुल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे युनिटला माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून 12 मे रोजी बँकॉकहून आलेल्या 2 प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर हिरवा गांजा (हायड्रोपोनिक वीड) असलेले 11 हवाबंद पाऊच आढळून आले. कारवाई करत 9864 ग्रॅम हिरवा गांजा (हायड्रोपोनिक वीड) जप्त केले.

आरोपी दोघेही मुंबईचे राहणारे आहेत. त्यांची चौकशी केली असता त्यांच्या तिसऱ्या साथीदाराविषयी माहिती समोर आली. त्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी संशयित वितरकाला अटक करून मुंबईतील घराची झडती घेतली. तेंव्हा यात त्याच्या घरी 478 ग्रॅम चरस आणि गांजा मिळून आला.

दरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाने तिन्ही आरोपींकडून एकूण 10 किलो 300 ग्रॅम असा आंतरराष्ट्रीय बाजारात 10 कोटी 30 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी तिघांवर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना 23 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments