Wednesday, June 4, 2025
Homeक्राईम न्यूजकर्वे रस्त्यावर वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कर्वे रस्त्यावर वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यातील डेक्कन परिसरात कर्वे रस्त्यावर अपघाताची घटना घडली. या अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका खाजगी सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नंदकिशोर धोंडू महाडिक (वय 60 वर्ष, रा. एरंडवणे गावठाण) असे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी, कुणाल मोरे (वय 27 वर्ष, रा. सदाशिवपेठ) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरवारे कॉलेज समोरील सिग्नलजवळ युनियन बँकेच्या समोर कर्वे रस्ता डेक्कन परिसरात ही घटना 1 मे रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. सुरक्षारक्षक नंदकिशोर महाडिक हे फिर्यादी कुणाल मोरे यांच्याकडे नोकरी करत होते. ते ड्युटी संपल्यानंतर रात्रीच्यावेळी रस्त्याने पायी घरी जात होते.

घरी परतत असताना अज्ञात वाहनाने महाडीक यांना गरवारे कॉलेजसमोरील सिग्नजवळ जोरात धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन महाडीक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रविवारी (दि. 5) ला त्यांचा मृत्यू झाला.

फिर्यादीनुसार, पोलिसांनी फरार वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून शोध सुरू आहे. पुढील तपास पोलिस हवालदार घोडके करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments