Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजशिरूरमध्ये बेकायदेशीरपणे दारूची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

शिरूरमध्ये बेकायदेशीरपणे दारूची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिक्रापूर : आरणगाव (ता. शिरुर) येथील आलेगाव पागा रस्त्याच्या लगत हॉटेल मातोश्रीमध्ये बेकायदेशीपणे दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली. त्यांनतर पोलीस हवालदार अमोल चव्हाण, संदीप इथापे यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यांना एक इसम देशी विदेशी दारूच्या बाटल्या विक्री करताना मिळून आला.

दरम्यान पोलिसांनी तेथील दारुसाठा जप्त करत रवी ज्ञानोबा मखर (रा. आरणगाव) या इसमास ताब्यात घेतले. याबाबत पोलीस हवालदार संदीप भाऊसाहेब इथापे (वय ४३ रा. शिक्रापूर ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments