Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजब्रेडचे पैसे घेताना अल्पवयीन मुलींशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी पाव विक्रेत्याला अटक; वारजे...

ब्रेडचे पैसे घेताना अल्पवयीन मुलींशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी पाव विक्रेत्याला अटक; वारजे माळवाडी येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यातुन संतापजनक घटना समोर आली आहे. दररोज घरी पाव व ब्रेड विक्री करण्यासाठी येणाऱ्याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जवळ ओढून तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. समसाद खॉ (रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी) असे या पाव विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी या पाव विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत एका 45 वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2 मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समसाद खॉ हा नेहमी पाव व ब्रेड विक्री करण्यासाठी यांच्याकडे येतो. 2 मे ला फिर्यादी यांच्या 14 आणि 12 वर्षाच्या दोन मुली घरात असताना आरोपी नराधम समसाद घरात आला. घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेऊन पाव व ब्रेडचे पैसे घेताना त्याने 14 वर्षीय मुलीला जवळ ओढले आणि तिच्याशी अश्लिल वर्तन केले. त्यानंतर 12 वर्षीय मुलीबरोबरही त्याने अश्लिल वर्तन केले.

दरम्यान, मुलींनी फिर्यादी या घरी आल्यानंतर त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगिला. त्यानंतर पोलिसठाणे गाठत त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी समसाद खॉ याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments