Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजशेअर बाजारात नफ्याचे आमिष, 16 लोकांना तब्बल पावणेतीन कोटींना गंडवले; समर्थ पोलिसांत...

शेअर बाजारात नफ्याचे आमिष, 16 लोकांना तब्बल पावणेतीन कोटींना गंडवले; समर्थ पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यात शेअर बाजारातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 16 जणांची तब्बल पावणेतीन कोटींची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आले आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर मधुकर नेहेते (वय 61 वर्ष, रा. मानाजीनगर, नन्हे) आणि शितल काळे (वय 40 वर्ष, रा. पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत विद्या विजयेंद्र मानुरकर (वय 50, रा. भवानीपेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रभाकर आणि शितल यांनी शेअर बाजारातील एका कंपनीचे सब ब्रोकर असल्याची बतावणी करून तक्रारदार विद्या यांच्यासह 16 जणांना शेअर बाजारातील गुंतवणुकीतुन मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. याबाबत आवश्यक दस्तावेजांची नोंद देखील करून घेतली. या 16 गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन त्यांना कोणताही परतावा दिल नाही. त्यांची तब्बल 2 कोटी 79 लाख 38 हजारांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार 2020 ते मे 2025 या दरम्यान घडला.

दरम्यान, फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समर्थ पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments