Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजभारतीय हवाई दल पाकिस्तानला भिडणार; गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमान उतरणार

भारतीय हवाई दल पाकिस्तानला भिडणार; गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमान उतरणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उत्तरप्रदेश : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतपाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई सैन्य दलाने सरावाला सुरुवात केली असून भारतीय हवाई दल आता आपली ऐतिहासिक ताकद दाखवणार आहे. गंगा एक्सप्रेसवरील शाहजहांपूर येथे बनलेल्या साडे तीन किमी रस्त्यावर हवाई दलाचे लढाऊ विमान एअर शो करून शत्रूला ताकद दाखवणार आहे.

भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे लैंडिंग गंगा एक्सप्रेसवर बनवण्यात आलेल्या धावपट्टीवर होणार आहे. गंगा एक्सप्रेस वे वरील ही देशातील पहिली अशा प्रकारची हवाई पट्टी आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत या लढाऊ विमानाचे लँडिंग होणार आहे. या मिशनमध्ये आज (2 मे) वायूसेनेचे सर्वात एडवान्स फायटर टेकऑफ आणि लँडिंग करतील. या एअर शो मध्ये जगुआर आणि मिराजसारखे लढाऊ विमानेही सहभागी होणार आहेत. आपत्कालीन स्थितीत एक्सप्रेस हायवेला रनवे बनवण्याचा पर्याय म्हणून या एअर शो कडे पाहिले जाते.

शाहजहांपूरमधील गंगा एक्सप्रेसवर पीरू गावाजवळ साडे ३ किमी लांब हवाई पट्टी बनवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही हवाई पट्टी खूप महत्त्वपूर्ण आहे. या रनवेवर जवळपास २५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय १ हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी सुरक्षा सांभाळत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी ६ पथके तैनात आहेत. मिनी ब्लड बँकपासून अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments