इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच पुण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने एका तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर पाच वर्षांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. याबाबत तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात पोलीस उपनिरीक्षकपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या तरुणाने 28 वर्षीय तरुणीशी नोंदणी पद्धतीने लग्न केले. मात्र, त्याबद्दल त्याने कुटुंबीय आणि मित्र परिवारात सांगितले नाही; तसेच तिला समाजात पत्नी म्हणून ओळख दिली नाही. लग्नाबद्दल घरी सांगतो,’ असा विश्वास दाखवून त्याने तरुणीकडून वेळोवेळी १० ते १२ लाख रुपये घेतले. तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली. तेव्हा आरोपीने जबरदस्तीने तिला गर्भपात करायला लावला. तरुणीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या या पोलिस उपनिरीक्षकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
एका २८ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फलटण येथील गोखली गावातील ३२ वर्षीय तरुणासह त्याचा भाऊ आणि वडील यांच्यावर या प्रकरणी अट्रॉसिटी कायद्यांसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.