Saturday, June 7, 2025
Homeक्राईम न्यूजफुरसुंगी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजेंद्र हरपळे यांचे निधन

फुरसुंगी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजेंद्र हरपळे यांचे निधन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर : फुरसुंगी (ता. हवेली) येथील प्रसिद्ध बांधकामव्यावसायिक राजेंद्र गेनू हरपळे (वय 61) यांचे गुरुवारी (ता.1) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे. बांधकाम क्षेत्रातील हुशार, अनुभवी, प्रेमळ व एक उत्कृष्ट नेतृत्व हरपल्याने फुरसुंगी सह परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, राजेंद्र हरपळे यांच्या पार्थिवावर फुरसुंगी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व बांधकाम क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनी हजेरी लावली. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. थेऊर येथील उद्योजक गणेश कुंजीर व विनायक कुंजीर यांचे ते मामा होत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments