Friday, November 22, 2024
Homeक्राईम न्यूजयंदा ७२ विवाह मुहूर्त; नागरिकांचा दागिने खरेदीकडे कल

यंदा ७२ विवाह मुहूर्त; नागरिकांचा दागिने खरेदीकडे कल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः तुलसी विवाह सोहळा कार्तिक शुध्द द्वादशी बुधवार दि. १३ नोव्हेंबर ते कार्तिक पोर्णिमा शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न झाला. यानंतर खऱ्या अर्थाने विवाहमुहुर्ताची धामधुम सुरू झाली. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत विवाह मुहुर्त नसल्यामुळे मंगल कार्यालयातदेखील वर्दळ नव्हती. मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत आता १४ मुहुर्त असल्यामुळे पुन्हा लग्नसराईची लगबग सुरू आहे. पुढील तुलसी विवाहापर्यंत तब्बल ७२ मुहुर्त आहेत. सोने-चांदी दराने मध्यंतरी उच्चांक गाठला होता. परंतु, मागील काही दिवसांपासून दर सरासरी ५ ते ६ हजारांनी उतरले आहेत. त्यामुळे आता पुन्हा सराफी दुकानात गर्दी होत आहे.

गतवर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ५४ लग्न मुहुर्त होते. त्यावेळी सोन्याचे भाव ६४ हजाराच्या आसपास स्थिर झाले होते. कालांतराने दराचा रेषो पुन्हा वर चढण्यास प्रारंभ झाला. जुलै महिन्यात सोन्याचा दर ७१ हजार ५०० रुपयांच्या आसपास स्थिर झाला होता. सध्या हाच दर ७६ हजार ३००, तर चांदी ९२ हजारवर गेला आहे. सांगलीत आता नामांकित सोने विक्री कंपन्यांची दालने प्रामुख्याने विश्रामबाग परिसरात सुरु झाली आहेत. मुहुर्ताच्या पूर्वी खरेदीसाठी दालनांमध्ये गर्दी होत आहे.

दोन महिन्यात १४ मुहुर्त

सध्या लगीनघाई सुरु आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत १४ मुहुर्त आहेत. त्यामुळे लग्नसराईचे पुढील १४ दिवस सर्वच मंगल कार्यालयात गर्दी होणार आहे. महुर्तावर लग्न करण्याकडे बहुतेकांचा कल असला, तरी यादी पे शादीस देखील काहींची पसंती आहे. नोव्हेंबर महिन्यातील दि. २२, २३, २४, २५, तर डिसेंबर महिन्यात दि. २, ३, ४, ५, ९, १०, ११, १३, १४ आणि १५ रोजी मुहुर्त आहेत. तसेच पुढील वर्षी सहा महिन्यात ५८ विवाह मुहुर्त आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments