Thursday, November 21, 2024
Homeक्राईम न्यूजतळेगाव-शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी होणार दूर; तळेगावर-शिक्रापूरसह हडपसर-यवत महामार्गाच्या कामाला मंजुरी

तळेगाव-शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी होणार दूर; तळेगावर-शिक्रापूरसह हडपसर-यवत महामार्गाच्या कामाला मंजुरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उन्नत मार्गाच्या (एलिव्हेटेड) प्रस्तावाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकराच्या स्वनिधीतून हे दोन्ही महामार्ग विकसिक केले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (मॉर्थ) बीपी आणि एसपी सेलचे कार्यकारी अभियंता नकुल प्रकाश वर्मा यांनी त्यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या राज्याचे मुख्य महाव्यवस्थापक रजनीश कपूर यांना पत्राद्वारे कळवले आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर (एनएच 548-डी) च्या अस्तित्वातील दुपदरी 54 किलोमीटर महामार्गाची सुधारणा करुन उन्नत उड्डाणपूल बांधणे. याबरोबरच हडपसर ते यवत (एनएच 65) च्या 32 किलोमीटर अंतरापर्यंतच्या सहापदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरचे बांधकाम करण्याचे काम आता राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत होणार असून त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून मंजरी देण्यात आली आहे.

मागील ऑगस्ट महिन्यामध्ये दोन्ही महामार्गांच्या कामाची अंमलबजावणी करणा-या संस्थेबाबत निर्णय घेणार तसेच पुढील आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भातील प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून ‘मॉर्थ’ कडे पाठवून त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सक्षम अधिका-यांच्या मान्यतेनुसार (एनएच 548 डी) तळेगाव-चाकण-शिक्रापीर आणि राष्ट्रीय महामार्ग 65 चे हडपसर-यवत या महामार्गाच्या कामाच्या प्रस्तावाची जबाबदारी एमएसआयडीसीला सोपविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

याबरोबरच पुणे-छत्रपती संभाजीनगर ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’ संदर्भात झालेल्या सामंजस्य कराराच्या नमुन्यानुसार राज्य सरकारच्या स्वनिधीतून हे दोन्ही महामार्ग विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी देखरेख करण्यासाठी राजमार्ग आणि द्रुतगती मार्गाच्या मानांकनानुसार ‘मॉर्थ’, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआयडीसी अधिका-यांचा समावेश असलेली कार्यकारी समिती स्थापन करण्याची अट ठेवण्यात आलेली आहे.

दरम्यान, या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. पुण्यातील घोरपडी येथे लवकरच एमएसआयडीसी चे स्वतंत्र कार्यालय सुरु होणार आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामास आता राज्य शासनाकडून गती मिळण्याच्या शक्यतेने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments