Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजकार्यकर्त्याचं असंही प्रेम...! अजित दादांसाठी आणली चक्क सोन्याची मिठाई; गोल्डन मिठाईची होतेय...

कार्यकर्त्याचं असंही प्रेम…! अजित दादांसाठी आणली चक्क सोन्याची मिठाई; गोल्डन मिठाईची होतेय सर्वत्र चर्चा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : बारामतीमध्ये पाडव्याचा सण जोरदार साजरा करण्यात आला. 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबात दोन दिवाळी पाडव्याचे सण साजरे करण्यात आले. शरद पवार यांचा गोविंदबाग येथे तर अजित पवार यांचा पहिल्यांदाच काटेवाडी येथे दिवाळी पाडवा साजरा करण्यात आला. दोन्ही पवारांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती.

दरम्यान, सकाळी सात वाजता अजित पवार आणि सुनेत्रा पवार काठेवाडी येथे दिवाळी पाडव्यासाठी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांने दादांचं तोंड गोड करण्यासाठी सोन्याची मिठाई आणली होती, अजित पवार यांच्यासाठी आणलेल्या सोन्याच्या मिठाईची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही मिठाई बनवण्यात आली आहे.

अनेक वर्ष पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते बारामती मध्ये येत असतात. अशाच एका कुटुंबातील तिन्ही पिढ्या एकत्र अजित पवार याना शुभेच्छा देण्यासाठी आल्या आहेत. यावेळी आम्ही अजितदादांसोबतच आहोत असा विश्वास दर्शवत कार्यकर्त्यांनी समर्थन दिलं आहे. तसेच सोन्यासारख्या माणसाला सोन्याची मिठाई आणली आहे. यामध्ये ९९ टक्के सोन्याचा अर्क आहे. एक आठवडा ही मिठाई बनवायला लागला आहे. चितळे बंधु यांच्याकडून ही मिठाई तयार करून घेतली आहे, अशी माहिती यावेळी या कार्यकर्त्यांने दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments