Thursday, October 31, 2024
Homeक्राईम न्यूजमोठी बातमी ! प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

मोठी बातमी ! प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये आंबेडकर यांच्यावर सकाळी अँजिओग्राफी झाली आहे.

पुढील तीन ते पाच दिवसांपर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात असणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती पक्षातील प्रवक्त्यांनी दिली आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments