Thursday, November 21, 2024
Homeक्राईम न्यूजचोरीच्या संशयावरुन तरुणाचा खून; खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात

चोरीच्या संशयावरुन तरुणाचा खून; खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पान टपरीतील झालेल्या चोरीच्या संशयावरुन दोघांनी तरुणाला बियर पाजण्यासाठी नेऊन तीक्ष्ण हत्याराने मारहाण करुन खुन केल्याची घटना घडली आहे. हि घटना दारुंब्रे येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अक्षय नरेंद्र सोरटे (वय-२८, रा. दारुंब्रे, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी नरेंद्र किसन सोरटे (वय-५२, रा. दारुंब्रे, ता. मावळ) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संग्राम ऊर्फ नामदेव मारोती सोरटे (वय-३२) आणि नवनाथ वाघोले (वय-३४, दोघेही रा. दारुंब्रे, ता मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम सोरटे याची पान टपरी आहे. नवनाथ वाघोले हा त्याच्या पान टपरीमध्ये कामाला आहे. एक महिन्यांपूर्वी सोरटे याच्या पानटपरीत चोरी झाली होती. त्याचा संशय अक्षय सोरटे याच्यावर होता. तसेच नवनाथ वाघोले याच्या आई व बहिणीसोबत अक्षय याची बाचाबाच झाली होती, त्यामुळे त्यांच्यात किरकोळ भांडण झाले होते.

याचाच राग मनात धरुन दोघांनी अक्षय याला बिअर पाजण्यासाठी दारुंब्रे येथील संग्राम सोरटे याच्या नवीन बांधकाम सुरु असलेल्या हॉटेलजवळ नेले. बिअर पाजल्यानंतर अक्षय याच्या डोक्यावर तसेच अंगावर बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.

दरम्यान, त्याला जीवे मारल्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दिपक सोरटे यांच्या ऊस शेताच्या बाजूला असलेल्या पडीक शेतात टाकून आरोपी पळून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments