Friday, November 22, 2024
Homeक्राईम न्यूजवरवंड येथे दोन एसटी बसच्या अपघाताचा थरार...! दोन ठार, ६९ प्रवासी जखमी;...

वरवंड येथे दोन एसटी बसच्या अपघाताचा थरार…! दोन ठार, ६९ प्रवासी जखमी; नेमका कसा घडला अपघात ?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वरवंड : पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड (ता. दौंड) येथे दोन एसटी बस गाड्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर गंभीर व किरकोळ असे तब्बल ६९ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

नामदेव बाबुराव आढाव (वय ७८, रा. चिंचपूर, आष्टी, बीड) आणि सुवर्णा संतोष होले (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नाव आहे. दरम्यान, दोन्ही एसटीमध्ये रक्ताचा पडलेला सडा, अडकलेले प्रवासी, रडण्या-ओरडण्याचा आवाज या भयायनक दृष्याने नागरीकांचे अक्षरशः काळीज पिळवटुन गेले. यावेळी तब्बल १० ते १२ रुग्णवाहीकेतुन जखमींना उपचारासाठी तालुक्यातील काही काही रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नेमकं काय घडलं?

पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाने जामखेड-पुणे ही एसटी (एमएच ११बीएल९४११) जामखेडहुन पुण्याच्या दिशेने जात होती. तर पुणे-तुळजापुर एसटी (एमएच १४ बीटी३३७९) तुळजापुरकडे चालली होती. दुपारी सव्वा एक वाजता वरवंड येथील कौठीचा मळा भागात पुण्याकडे जाणारी जामखेड एसटी बस अचानक दुभाजकामधुन पलीकडच्या मार्गावर गेली. त्याचवेळी समोरुन तुळजापुर एसटी येत होती. या दोन्ही एसटींची समोरा समोर जोरदार धडक झाली. जामखेड एसटी अपघातानंतर महामार्ग सोडुन काही अंतर उत्तर दिशेला जावुन थांबली. दोन्ही एसटीमध्ये एकुण १०५ प्रवासी होते.

परीसरातील नागरीकांनी जखमींना मदत करण्यास सुरुवात केली. एसटीत अनेक प्रवासी गंभीर जखमी तर काही जण अडकले होते. तसेच दोन्ही एसटीचे चालक गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती माहीती मिळताच पाटस पोलिस, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरीक व पोलिसांनी पाटस टोल प्लाझा व खासगी रुग्णालयाच्या तब्बल १२ ते १३ रुग्णावाहीकेतुन प्राथमिक आरोग्य केंद्र, अक्षयनर्सिंगहोम, हर्ष हॉस्पीटल, पाटील हॉस्पीटल व इतर दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

या घटनेत एकुण ६९ प्रवासी जखमी झाले. तर उपचारादरम्यान एका महीलेचा मत्यू झाला. मृतांचा आणखी आकाडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी भेट देवुन अपघाताची माहीती घेतली. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments