Friday, November 22, 2024
Homeक्राईम न्यूजमोठी बातमी...! शरद पवारांनी मोहोळचा उमेदवार बदलला; सिद्धी कदमांचा पत्ता कट, आता...

मोठी बातमी…! शरद पवारांनी मोहोळचा उमेदवार बदलला; सिद्धी कदमांचा पत्ता कट, आता कोणाला उमेदवारी देणार?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबईः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघातून सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अचानक कदम यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. सिद्धी या मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते.

सोमवारी सकाळी मोहोळ विधानसभेतील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर शरद पवारांनी या सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सिद्धी कदम यांची उमदेवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिद्धी रमेश कदम यांचा नावे देण्यात आलेला एबी फॉर्म रद्द समजण्यात यावा, असं पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवले आहे. त्यामुळे सिद्धी कदम यांच्याऐवजी आता शरद पवार गटाकडून मोहोळमधून कोणता उमेदवार दिला जाणार, हे पाहावे लागणार आहे. तत्पूर्वी सिद्धी कदम यांनी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सोमवारी आपला उमेदवार अर्ज भरला. मात्र, आता शरद पवार गटाच्या भूमिकेमुळे रमेश कदम आणि सिद्धी कदम काय भूमिका घेणार, हे देखील पाहावे लागेल.

दरम्यान, सिद्धी कदम या वयाने लहान असल्यातरी त्यांना निवडणुकीची प्रचार मोहीम हाताळण्याचा चांगला अनुभव होता. सिद्धी कदम हिने गत 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्धच प्रचार यंत्रणा राबवून तगडी फाईट देखील दिली होती. विद्यमान आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांनाच वडिलांसाठी टक्कर दिली होती.

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहार प्रकारणात सिद्धीचे वडील रमेश कदम यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा विधानसभा निवडणुकांची धुरा सिद्धीनेच सांभाळली होती. त्यावेळी अपक्ष असलेल्या रमेश कदम यांना 23 हजारांहून अधिक मतं मिळाली होती, त्यामध्येही सिद्धीच्या उत्तम नियोजनाचा व सोशल बॉण्डिंगचा मोठा फायदा झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments