इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची १४ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातील कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदार संघातून रमेश बागवे यांना, तर शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली होती. तर, दुसऱ्या यादीत 23 आणि तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर, आता काँग्रेसने 14 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर झालेल्या सोलापूर दक्षिण मतदारसंघातून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भगिरथ भालके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, आताकाँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसची चौथी यादी
1. अमळनेर अनिल शिंदे
2. अमरेड – संजय मेश्राम
3. आरमोरी – रामदास मश्राम
4. चंद्रपूर – प्रवीण पडवेकर
5. बल्लारपूर – संतोषसिंह रावत
6. वरोरा- प्रवीण काकडे
7. नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार
8. ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे
9. नालासोपारा – संदीप पांडेय
10. अंधेरी पश्चिम- अशोक जाधव 11. शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट
12. पुणे छावणी- रमेश बागवे
13. सोलापूर दक्षिण- दिलीप माने
14. पंढरपूर- भगिरथ भालके