इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
रांजणगाव गणपती : बाभुळसर (ता. शिरूर) येथे दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मित्रांबरोबर बाजारात निघालेल्या तरुणावर कोयत्याने वार करू गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बाभुळसर डहाळे यांचे बिल्डिंग जवळील रॉयल चिकन शॉपी दुकानं समोर घडली.
या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षय रामदास शिवले (वय-26 वर्ष, रा. बाभूळसर, आशापुरा बिल्डिंग समोर, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. निमगाव म्हाळुंगी, शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी निखिल रामचंद्र वीडगीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेय माहितीनुसार, २९ सप्टेंबर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बाभुळसर डहाळे यांचे बिल्डिंग जवळील रॉयल चिकन दुकानासमोरून फिर्यादी आणि त्याचे मित्र अनिकेत मगरे व धनंजय भोसले यांचेसह पायी कारेगाव येथील बाजारात जात होते. त्यावेळी दुपारी झालेल्या वादाच्या कारणावरून निखिल वीडगीर यांने चिकन दुकानातील कोयता घेऊन अक्षय शिवले याच्या पाठीमागून येऊन त्याच्या डाव्या बाजूस मारून गंभीर जखमी केले.
दरम्यान, अक्षय तेथून पळून जाऊ लागला. तेव्हा आरोपी निखिलने त्याच्या हातातील कोयता अक्षयच्या दिशेला फेकून मारला. तसेच शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश आगलावे करत आहे.