Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूज'ते' हेलिकॉप्टर सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालेलं; मात्र त्याआधीच...

‘ते’ हेलिकॉप्टर सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालेलं; मात्र त्याआधीच…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हेच हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना मुंबईतून घेण्यासाठी निघालं होतं, मात्र त्याआधीच हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

आज सुनील तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. या हेलिकॉप्टरचे नाव ऑगस्टा 109 असे होते. हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या वैमानिकांची ओळख पटली आहे. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांना हे हेलिकॉप्टर भाडेतत्त्वार दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

कुठे झाला होता अपघात ?

पुण्यात ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उड्डाण केलं होतं. काही अंतर कापल्यानंतरच हेलिकॉप्टरला बावधन बुद्रुक परिसरामध्ये अपघात झाला. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल या केंद्र सरकारची संस्थेच्या परिसरादरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरने पेट घेतला. आणि त्यात असलेल्या दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments