Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजवाघाळे येथील उपसरपंचांच्या तत्परतेमुळे बिबट्या जेरबंद; सोनवणे यांचे सर्वत्र कौतुक...

वाघाळे येथील उपसरपंचांच्या तत्परतेमुळे बिबट्या जेरबंद; सोनवणे यांचे सर्वत्र कौतुक…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

तळेगाव ढमढेरे : वाघाळे (ता. शिरुर) येथे पहाटेच्या सुमारासकोंबड्यांवर ताव मारण्यासाठी बिबट्या खुराड्यात शिरला. मात्र येथील उपसरपंच दादासाहेब सोनवणे यांच्या तत्परतेने बिबट्या खुराड्यात जेरबंद झाला असल्याने उपसरपंच सोनवणे यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

वाघाळे ता. शिरुर येथे पहाटेच्या सुमारास दादासाहेब सोनवणे यांच्याघराबाहेर कोंबड्या ओरडल्याचा आवाज आल्याने सोनवणे यांनी शहानिशा करून जाळीचा दरवाजा बंद करून याबाबतची माहिती शिरुर वनविभागाला दिल्यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या आदेशानुसार वनपाल गणेश म्हेत्रे, वन कर्मचारी हनुमंत कारकूड, रेस्क्यू टीमचे जयेश टेमकर, शुभम शिस्तार, ऋषिकेश विधाटे, सुदर्शन खराडे, सचिन गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.

मात्र सदर बिबट्याने तब्बल सोळा कोंबड्यांचा फडशा पाडला असून उपसरपंचांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दादासाहेब सोनवणे यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments