Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजहवेली तालुक्यातील नायगाव पतसंस्थेला पुणे जिल्हा फेडरेशनचा आदर्श पतसंस्था पुरस्कार

हवेली तालुक्यातील नायगाव पतसंस्थेला पुणे जिल्हा फेडरेशनचा आदर्श पतसंस्था पुरस्कार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) येथील नायगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचा स्वर्गीय आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार देण्यात आला आहे. अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी दिली. सदर पुरस्कार फेडरेशनचे उपाध्यक्ष विनायकराव तांबे, सचिव शामराव हुलावळे व माजी अध्यक्ष शहाजीराव रानवडे व संचालक मंडळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नायगाव पतसंस्थेने 5 ते 15 कोटींच्या ठेवी या वर्गामध्ये संस्थेची सांख्यिकी माहिती फेडरेशन कडे सादर केली होती. त्यामध्ये फेडरेशनच्या वतीने सहकारातील तज्ञ व्यक्तींच्या कमिटी कडून माहितीची तपासणी करून गुणवारी देण्यात आली. नायगाव पतसंस्थेला पाच ते पंधरा कोटींच्या ठेवीच्या वर्गामध्ये द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

स्वर्गीय आमदार शिवाजीराव भोसले यांनी स्थापन केलेल्या पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सन 2024 साठी ठेवीच्या वर्गवारी नुसार पुरस्कारासाठी माहिती मागविली होती. त्यामध्ये नायगाव पतसंस्थेला पाच ते पंधरा कोटींच्या ठेवीच्या वर्गामध्ये द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

दरम्यान, पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चौधरी, व्यवस्थापक नंदकुमार चौधरी, संचालक उत्तम घुले, रामचंद्र माने, विशाल चौधरी, गौरव चौधरी, व माजी सरपंच गणेश आबा चौधरी उपस्थित होते.

याबाबत बोलताना संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चौधरी, म्हणाले, “सदर पुरस्कार हा सभासद, ठेवीदार व हितचिंतकांनी संस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे प्राप्त झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments