Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजवाळुंज गावच्या उपसरपंचपदी सुप्रिया इंगळे यांची बिनविरोध निवड

वाळुंज गावच्या उपसरपंचपदी सुप्रिया इंगळे यांची बिनविरोध निवड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सासवड : वाळुंज (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया जयदीप इंगळे यांची बिनविरोध निवड झाली. वाळुंजचे उपसरपंच कैलास इंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

यावेळी निर्धारित कालावधीत सुप्रिया इंगळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच रेश्मा चौरे यांनी सुप्रिया इंगळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेविका सोनाली पवार यांनी सहकार्य केले. यावेळी सोसायटीचे सचिव संतोष राऊत, माजी सरपंच कैलास म्हेत्रे, माजी उपसरपंच कैलास फ. इगळे, ग्रामपंचायत सदस्य योगिता इंगळे उपस्थित होते.

निवडीनंतर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य डॉ. रमेश इंगळे, माजी उपसरपंच गोविंद इंगळे, तंटामुक्त मुक्त समितीचे अध्यक्ष अंकुश इंगळे, सोसायटीचे अध्यक्ष सर्जेराव इंगळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र इंगळे, राहुल चौरे, प्रशांत म्हेत्रे, बापू चौरे, सोनबा भोंगळे, शंकर इंगळे, अंकुश इंगळे, संजय म्हेत्रे, जयदिप इगले, सागर इगले, सुहास इगले, शुभम इगले, शिवराज इगले, श्रीकांत इंगळे, श्रीधर इंगळे, संकेत इंगळे, अनिकेत नवले, योगेश जगताप, शुभम राऊत, प्रतीक इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments