Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजपुणेकरांसाठी महत्वाची बातमी...! शहरातील 'या' भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी…! शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : दक्षिण पुण्यातील अनेक भागातील पाणीपुरवठा २६ सप्टेंबर (गुरुवार) रोजी बंद राहणार असून २७ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. याबाबतची माहिती पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) सोशल मीडियावर दिली आहे.

केदारेश्वर पंपिंग स्टेशन, कात्रज येथे मुख्य व्हॉल्व्हचे आणि मुख्यवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा गुरुवारी एक दिवस बंद असणार आहे. तर शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी अशी माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालीलप्रमाणे – बालाजी नगर, पुण्याई नगर, काशिनाथ पाटील नगर, श्री हरी सोसायटी परिसर, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रस्ता, वरखडेनगर, ओम्कार, भूषण सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, राजस सोसायटी, कदम प्लाझा परिसर

सुखसागर नगर भाग – १ व भाग-२, आगममंदिर परिसर, संतोष नगर, अंजली नगर, दत्तनगर, जांभूळ वाडी रस्ता, आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, मोरे बाग परिसर, चंद्रभागा नगर, भारती विद्यापीठ मागील परिसर, कात्रज कोंढवा रस्ता संपूर्ण परिसर, शिवशंभो नगर, गोकुळनगर, साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, अशरफनगर, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व सुपर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, सोमजी बस स्टॉप परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता, साई सर्व्हिस, पारगे नगर, खडी मशीन परिसर, बधेनगर, येवलेवाडी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments