Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात पीएमपीएल चालकाचे भयानक कृत्य; चक्क डोळा मारत केला तरूणीचा विनयभंग

पुण्यात पीएमपीएल चालकाचे भयानक कृत्य; चक्क डोळा मारत केला तरूणीचा विनयभंग

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरातील पीएमपीएल बसमध्ये देखील महिला सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या तरूणीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करून डोळा मारत पीएमपीएल चालकाने तरूणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने पीएमपीएल बस प्रवाशांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक उमेश कांबळे (वय-३०) असं गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २१ वर्षीय तरूणीने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणी सोमेश्वरवाडी बसस्टॉप, पाषाण ते ग्रीन पार्क असा प्रवास करते. ती नेहमी हा प्रवास करते. प्रवासादरम्यान पीएमपीएल चालक उमेशने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तरूणीकडे पाहून हसत मोबाईल नंबर मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानूसार चतुः श्रृंगी पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments