Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजअखेर चर्चेला पूर्णविराम..! दौंडची उमेदवारी पक्षातच राहणार; पक्ष श्रेष्ठींचे कामाला लागण्याचे आदेश

अखेर चर्चेला पूर्णविराम..! दौंडची उमेदवारी पक्षातच राहणार; पक्ष श्रेष्ठींचे कामाला लागण्याचे आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत, (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पक्षाच्या पक्ष श्रेष्ठींच्या देशानुसार आज (२२ सप्टेंबर) महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दौंड येथे पार पडली. गेली अनेक दिवस दौंड तालुक्यातील उमेदवारी बाबत उलट सुलट चर्चा सुरु होत्या. मात्र या बैठकीत सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दौंड विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी एकत्रीत कामाला लागा असा वरिष्ठांचा संदेश आल्यानंतर जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या सुचनेनुसार सदर बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात तालुक्यातील प्रत्येक गावात संपर्क अभियान राबवायचे, तालुक्यातील सर्व मतदारांपर्यंत व समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचायचे अभियान सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात पारगाव पंचायत समिती गणातुन २४ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. तर या अभियानाचा समारोप दौंड शहरात होणार आहे.

या प्रसंगी महाविकास आघाडीतील शिवसेना जिल्हा प्रमुख शरद सुर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख अनिल सोनवणे, दौंड शहर प्रमुख आनंद पळसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाचे आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, डॉ. भरत खळदकर, डॉ. वंदना मोहिते, दिग्विजय जेधे या पाच इच्छुक उमेदवारांसह महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments