Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजटाकळी हाजीत मुस्लीम बांधवाकडून ईद मिलाद उन नबी साजरी !

टाकळी हाजीत मुस्लीम बांधवाकडून ईद मिलाद उन नबी साजरी !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रांजणगाव गणपती: जगाला शांती आणि एकतेचा संदेश देणारे पैंगबर मुहम्मद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत टाकळी हाजी मुस्लीम जमात, मुस्तफा यंग सर्कल यांच्या सयुक्त विद्यमाने ईद मिलाद उन नबी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. टाकळी हाजी हे सर्वधर्मियाचे गाव संपुर्ण गावात विविध सण सर्व धर्मिय मोठ्या आनंदाने साजरा करतात. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गावातुन छोटीसी मिरवणुक काढण्यात आली.

महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त मुस्तफा यंग सर्कलचे सचिव लालाभाई शेख यांनी समाजउपयोगी कामासह समाजातील वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव झटणार असून सर्वधर्मियांच्या विविध कार्यक्रमाना सहकार्य करणार आसल्याचे सांगीतले. धर्मगुरू मौलाना सलामत हुसेन यांनी प्रवचण केले. सरपंच दामू आण्णा घोडे, सेवानिवृत्त अधिकारी प्रभाकर गावडे, उपसरपंच गोविंद गावडे यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

मुस्लीम जमात तसेच मुस्तफा यंग सर्कलचे अध्यक्ष दगडूभाई हवालदार, सचिव लालाभाई शेख, खजिनदार अल्लाबकस मोमीन, उपाध्यक्ष हैदरअली हवालदार, अनिस हवालदार, असिफ पठाण फिरोज पठाण, सादिक हवालदार, दस्तगीर मोमीन, सादिक आतार, शेख अरिफ, अन्सार पटेल, फिरोज पटेल, अहेमद हवालदार, साकीब मोमीन, इब्राहिम पठाण, अब्दुल हवालदार सर्व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास विशेष परिश्रम घेतले.

क्रिडा विभाग महाराष्ट्र शासनाच्या किक बॉक्सिंग, तायक्वांदो स्पर्धेत निवड झालेल्या कुमारी मिजबा शौकत मुजावर हीचा मुस्लीम जमात मार्फत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना रहेमान खान तर आभार प्रदर्शन रफीक आतार यांनी केले. असंख्य मुस्लीम बांधवांसह सर्वधर्मीय बांधवानी हजर राहून महाप्रसादाचा अस्वाद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments