इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सविंदणे : भविष्यात पाणी हा शेतीसाठी अति महत्वाचा विषय होणार आहे. पाणी पळावा पाळवी होऊन राजकीय सत्ते साठी राजकार्ते बंधारे कालवे चाऱ्या यांचा आधार घेतील. पण पाणी वापर संस्थानी आपले हक्काचे पाणी सरक्षित करावे. असे मत मीना शाखा कालवा अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी व्यक्त केले. शिरूर तालुक्यातील जांबुत अंतर्गत 9 पदांच्या निवडणूका बिनविरोध पार पडल्या. यावेळी ते बोलत होते.
मीना सिंचन शाखेच्या या संस्था आहेत. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सुनील दाते यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी शरद डुकरे, अर्चना रसाळ, अजित साबळे, सुभाष झिंजाड, बन्सी कड, आढाव रावसाहेब, सर्व पाणी वापर संस्थेचे संचालक व घोड/कुकडी कालवा अध्यक्ष, सदस्य, सल्लागार उपस्थित होते.
पाणी वापर संस्थांचे बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष पुढील प्रमाणे…
१) छत्रपती पाणी वापर संस्था क्रं २३ भागडी/पिंपरखेड, अध्यक्ष : दशरथ भाऊ उंडे
२) जय मल्हार पाणी वापर संस्था क्रं २४ पिंपरखेड/चांडोह, अध्यक्ष : दत्तात्रय फकिरा रोकडे
३) भैरवनाथ पाणी वापर संस्था क्रं २५ चंडोह / फाकटे, अध्यक्ष संपत लक्ष्मण पानमंद
४) श्री कृष्ण पाणी वापर संस्था क्रं २६ औरंगपुर/पारगाव, अध्यक्ष : सुभाष रंगनाथ झिंजाड
५) मुक्ताई पाणी वापर संस्था क्रं २७ औरंपुर / पारगाव, अध्यक्ष : पांडुरंग कृष्णा डुकरे
६) पारेस्वर पाणी वापर संस्था क्रं २८ पारगाव, अध्यक्ष मोतीराम तुकाराम डुकरे
७) टेकडेस्वर पाणी वापर संस्था क्रं २९ पिंपरी कावळ/पारगाव, अध्यक्ष : फकीर बबन पाबळे
८) भैरवनाथ पाणी वापर संस्था क्रं ३० जांबुत, अध्यक्ष : बाळासाहेब हरिभाऊ पठारे
९) संत ज्ञानेश्वर पाणी वापर संस्था क्रं ३१ शरदवाडी, अध्यक्ष प्रशांत कृष्णा जोरी