Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजसासवड येथे आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला...

सासवड येथे आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारुन जाहीर निषेध

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सासवड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षाचे नेते व विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या बद्दल महायुतीचे आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

त्याबद्दल पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी व पुरंदर तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने सासवड येथील शिवतीर्थ चौक येथे आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारुन जाहीर निषेध करण्यात आले.

तसेच महायुतीचे आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक वैभव सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदिप पोमण, सुनिता कोलते, चेतन महाजन, अवधूत रणनवरे, विठ्ठल मोकाशी, संभाजी काळाणे, संतोष खोपडे, रोहित इनामके, संजय टिळेकर, सोपान रणपिसे, माऊली यादव, विकास इंदलकर, सुरज गदादे, दत्ता शिंदे, रफिक शेख, अशुतोष जगताप, अँड. पूनम शिंदे, मंजुषा गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments