Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजराष्ट्रवादीच्या बांधकाम व्यावसायिक सेलच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी योगेश जाधव

राष्ट्रवादीच्या बांधकाम व्यावसायिक सेलच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी योगेश जाधव

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन : कोरेगाव मुळ (ता. हवेली) येथील योगेश सुरेश जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार गट) मध्यमव लहान बांधकाम व्यावसायिक सेलच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात योगेश जाधव यांना निवडीचे पत्र माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले आहे. यावेळी मध्यम व लहान बांधकाम व्यावसायिक सेलचे जिल्हाध्यक्ष सौरभ कुंजीर व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर ही निवड राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित कार्याध्यक्ष योगेश जाधव म्हणाले की, बांधकाम व्यवसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामुख्याने काम करणार आहे. बांधकाम क्षेत्रात परवानगी मिळण्यासाठी ज्या छोट्या छोट्या व्यवसायांना अडचणी येतात त्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार आहे. तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी चोख पार पडून दिलेल्या संधीचे सोने करणार आहे. असे जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments