Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजवाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरव आणि नवी सांगवी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी दोन तरुणांनी १४ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. ही घटना ज्या ठिकाणी घडली तेथे आरोपींना घेऊन जात आज मंगळवारी (दि. १७) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धिंड काढली आहे. शशिकांत दादाराव बनसोडे आणि प्रथमेश अरूण इंगळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सांगवी मध्ये दहशत माजविण्यासाठी दोन तरुणांनी १४ वाहनांची तोडफोड केली होती. तसेच, पत्ता विचारूनही न सांगितल्यामुळे गतिमंद तरुणावर कोयत्याने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींना काही तासांतच अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार पाच दिवसांपूर्वी पिंपळे गुरव येथील मयुरीनगरी हाउसिंग सोसायटी परिसरात लाला पाटील आणि त्याच्या साथीदारांनी दोन जणांवर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेचा बदला घेण्यासाठी आरोपी बनसोडे व इंगळे हे पहाटे चारच्या सुमारास लाला पाटील याचा शोध घेत होते. यावेळी राजेश हा घराबाहेर उभा होता. त्यावेळी आरोपींनी त्याला लाला पाटील याचा पत्ता विचारला. त्याने पत्ता न सांगितल्याने तसेच त्याने कारच्या काचा फोडताना पाहिल्याने आरोपींनी राजेशवर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

यानंतर आरोपी बनसोडे आणि इंगळे या दोघांनी आपला मोर्चा मयूर नगरीकडे वळविला. तिकडे जात असताना रस्त्यात दिसेल त्या वाहनांवर कोयत्याने मारून वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकास्न केले होते. तसेच कोयते हवेत फिरवत दहशत माजवत आरोपी पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तोडफोडीच्या प्रकाराचा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी काही तासांतच आरोपींना बेड्या ठोकल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments