Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजसासवड येथे राहुल गांधी यांच्या विरोधात महायुतीचे आंदोलन

सासवड येथे राहुल गांधी यांच्या विरोधात महायुतीचे आंदोलन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सासवड : संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार, असे बेताल वक्तव्य आंबेडकर यांच्याबद्दल करण्यात आले. हे योग्य नाही, त्याबद्दल राहुल गांधी यांचा जाहीर निषेध करण्यात आला, असे जालिंदर कामठे यांनी सांगितले. आरक्षणासंदर्भात त्यांच्या मनात नक्की काय ? संविधानाबद्दल राहुल गांधींनी अगदी टोकाची भूमिका मांडली. ही बाब बरोबर नाही. त्यांचे डोके ठिकाणावर आहे का? हे समजत नाही, अशी प्रतिक्रिया अशोक टेकवडे यांनी व्यक्त केली.

आरक्षण संविधान हे आमचे हक्काचे असताना, बेताल वक्तव्य गांधींनी केले. प्रचार करून लोकसभेच्या निवडणूका घेतल्या. बाबासाहेबांनी संविधान, आरक्षण दिलेले ते त्यांना मान्य नाही. त्यासाठी काँग्रेसचा आटापिटा चालला आहे. दीनदुबळ्यांना आंबेडकर यांनी मुख्य प्रवाहात आणले. त्यांना दुजोरा देण्याचे काम हे काँग्रेस करत आहे. यावर बहिष्कार टाकला पाहिजे, असे वक्तव्य विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख दिलीप यादव, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष पंकज धिवार तसेच महायुतीचे बहुसंख्येने पदाधिकारी पोलीस बंदोबस्त, पत्रकार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments