Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजकार चोरीची आहे, पोलीस स्टेशनला चला म्हणत दूरवर नेले; नंतर केलं भयानक...

कार चोरीची आहे, पोलीस स्टेशनला चला म्हणत दूरवर नेले; नंतर केलं भयानक कृत्य, वाघोलीतील घटनेने खळबळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाघोली, (पुणे) : पुण्यातील वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चोरीची आहे. तुम्हाला पोलीस स्टेशनला यावे लागेल, असं सांगून दोघांनी एका व्यक्तीला वाघोलीतून दूरवर खामगाव येथे नेऊन त्याचा मोबाईल फोन हिसकावला. तसेच त्याची कार घेऊन दोघे पसार झाले. ही घटना वाघोली परिसरात शुक्रवारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी सचिन सुधाकर टिळे (वय-४७) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास टिळे हे अहमदनगर येथून कंपनीचे काम आटपून त्यांच्या कारमधून घरी वाकड येथे निघाले होते. त्यावेळी त्यांच्या कारचे चाक पंक्चर झाले. त्यामुळे ते पंक्चर काढण्यासाठी दुकान शोधत होते. त्याचवेळी दीड वाजण्याच्या सुमारास पुणे-नगर रोडवरील वाघोली येथील कान्हा मेटल्ससमोर एका कारमधून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची कार फिर्यादींच्या कारला आडवी लावून तुम्ही चालवित असलेली कार चोरीची आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या बरोबर पोलीस चौकीला चला, असं सांगून कारमध्ये बसले. त्यांच्याकडील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला.

त्यानंतर कार खराडी रोडने आव्हाळवाडी मांजरी, कोलवडी, थेऊर मार्गे गणेश नगर खामगावपर्यंत नेली. आजुबाजुला शेती आहे, हे पाहुन दमदाटी करुन रात्री अडीचच्या सुमारास गाडी थांबविण्यास सांगितले. मोकळ्या रोडवर कारमधून खाली उतरवून कार घेऊन पसार झाले. यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments