Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजसात वर्षीय चिमुकलीच्या गळ्याला चाकू लावून बलात्कार; ७८ वर्षीय नराधमाचे पुण्यात धक्कादायक...

सात वर्षीय चिमुकलीच्या गळ्याला चाकू लावून बलात्कार; ७८ वर्षीय नराधमाचे पुण्यात धक्कादायक कृत्य

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ७८ वर्षीय नागरिकाने ७ वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य करत तिच्या गळ्याला चाकू लावून लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पुन्हा शहर हादरून गेलं आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात निर्भयाच्या आजीने तक्रार दिली आहे. त्यानूसार मधुकर पिराजी थिटे (वय ७८, रा. धनकवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थिटे व पिडीत मुलीचे कुटूंबिय एकाच भागात राहत आहे. पिडीत ७ वर्षीय चिमुकलीला घटनेच्या दिवशी दुपारी गोड बोलून आरोपीने घरी नेले. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत नराधमाने या चिमुकलीकडून किळसवानी कामे करून घेतली. नंतर तिला पुन्हा दुसऱ्या खोलीत नेवून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. यावेळी मुलीने आरडाओरडा केला त्यामुळे नराधम आरोपीने तिचा गळा आवळला.

तसेच तिच्या गळ्यावर चाकू ठेवून ‘तु कोणाला काही सांगायचे नाही. गप्प बसायचे, आई-पप्पाला कोणालाच काही सांगायचे नाही, असं म्हणून धमकावले. पोलीस जर का माझ्या घरी आले तर मी तुझा जीव घेईल, अशी धमकी देत अश्लील कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा दाखल आहे. दरम्यान, हा प्रकार गेल्या आठवड्यात घडला असून नुकताच उघडकीस आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments