Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूज१५ सप्टेंबरपासून पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार; पुण्यातून दुपारी, तर हुबळीतून पहाटे...

१५ सप्टेंबरपासून पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार; पुण्यातून दुपारी, तर हुबळीतून पहाटे सुटणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुणे-हुबळी-मिरज-पुणे अशी ही वंदे भारत एक्स्प्रेस येत्या १५सप्टेंबरपासून पुणे रेल्वे स्थानकावरून धावणार आहे. मुंबई-कोल्हापूर वंदे भारत सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासूनची होती. मध्य रेल्वेकडून अखेर वद भारत रेल्वे सुरू करण्यात येत आहे. हुबळी आणि पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडण्यासाठी ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ही पुण्यातून दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे. मिरज येथे सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचणार असून, हुबळी येथे रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी पोहोचणार आहे. या एक्स्प्रेसला सर्व आठ वातानुकूलित कोच जोडण्यात आले आहेत. तर, हुबळी येथून सकाळी ५ वाजता सुटणार असून, मिरज येथे सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल, तर दुपारी दीड वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे.

दरम्यान, पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे म्हणाले की, येत्या १५ सप्टेंबरपासून वातानुकुलित वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहे. पहिली गाडी हुबळी स्थानकावरून पुण्यासाठी सुटणार आहे. अनेक महिन्यांच्या पाठपुराव्यामुळे ही सेवा सुरू होत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोई आता दूर होणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments