इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
रांजणगाव गणपती : शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला नागरिकांनी पकडून आणल्यानंतर गुन्हा दाखल केला तर मी जीव देईल, असे म्हणून खिडकीवर डोके आपटून एका आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
परमेश्वर नागनाथ धेवडे असे आरोपीचे नाव आहे.
तर याबाबत पोलीस शिपाई प्रतिक भाऊसाहेब जगताप (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन) येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी परमेश्वर धेवडे (वय 24, रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस हवालदार बापू हाडगळे, पोलीस शिपाई प्रतिक जगताप, महिला पोलीस शिपाई काजल सरोदे हे त्यांचे कर्तव्य बजावत होते. तेव्हा एका युवतीचा मोबाईल हिसकावणाऱ्या परमेश्वर धेवडे या व्यक्तीला नागरिकांनी पकडून आणले. सदर व्यक्तीने फिर्यादी युवतीला तुला नवीन मोबाईल देतो असे म्हणत आरडाओरडा केला. पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल करु नये, नाहीतर मी जीवच देईल, असे म्हणून पोलीस ठाण्यातील खिडकीवर जोरात डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान आरोपीच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले, याबाबत पोलीस शिपाई प्रतिक जगताप यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.