Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजदगडूशेठ'ला 50 लाखाचा हिऱ्याचा तिलक अर्पण; लाडक्या गणरायाचे रूप पाहण्यासाठी गर्दी

दगडूशेठ’ला 50 लाखाचा हिऱ्याचा तिलक अर्पण; लाडक्या गणरायाचे रूप पाहण्यासाठी गर्दी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला अनेक भक्त विविध प्रकारचे सोने, चांदीचे दागिने अर्पण करत असतात. यंदाच्या गणेशोत्सवात देखील सॉलिटेरियो डायमंडस तर्फे गणपतीला 50 लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक अर्पण करण्यात आला आहे. गणरायाच्या शुंडाभूषणामध्ये हा तिलक बसविण्यात आला आहे. या हिऱ्याच्या तिलकामुळे लाडक्या गणरायाचे रूप अधिकच विलोभनीय दिसत आहे.

उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सॉलिटेरियो डायमंड्सचे मालक प्रख्यात बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी श्रीं चे दर्शन घेऊन हा तिलक अर्पण केला आहे. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.

सॉलिटेरियो डायमंड्स तर्फे 12 दिवस हा 66 कॅरेट हि-याचा तिलक साकारण्याचे काम सुरु होते. गणरायांच्या आभूषणांपैकी असलेल्या शुंडाभूषणाच्या वरच्या बाजूला हा तिलक लावण्यात आला आहे. तब्बल 150 तास कारागिरांनी अत्यंत कलाकुसरीने हा हिऱ्याचा तिलक साकारला आहे. गणेशोत्सवात भाविकांना हा हिऱ्याचा तिलक पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments