इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा निवडणुक सर्वाधिक लक्षवेधी ठरली होती. या निवडणुकीत नणंद विरुद्ध भावजय लढतीत पवार बाप-लेकीनं यश खेचून आणलं. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक बारामतीतून शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हा नवीन युवा चेहरा पवारांच्या राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे अजित पवार बारामती सोडणार अशी जोरदार चर्चा आहे. स्वतः अजित पवारांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे बारामतीत अजित पवार गटाकडून विधानसभेला रिंगणात कोण उतरणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आता बारामतीमध्ये ‘गब्बर’ या नावाने एक पत्र तुफान व्हायरल होत आहे. काय आहे या पत्रात जाणून घेऊया ?
काय आहे नेमकं पत्रात ?
नमस्कार बारामतीकर !….
अनेक वर्षे झाली बारामतीकर साहेब, दादा, ताई यांच्यावर प्रेम करतात. मात्र सर्वांना माहित आहे, सध्याचं राजकीय वातावरण भलतंच गढूळ झाल आहे. साहेबांचं नाव पुढे करून दादांचा काटा काढायचाय की काय? बापाने ताईचा प्रचार प्रमुख राहून साहेबांचा निष्ठावान असल्याचं दाखवून दिलं. मात्र मुलांनी याच मिळालेल्या वारशाचा वापर करून दादांचा विश्वास संपादन केला. मात्र दादांचा प्रचार करण्याच्या नावाखाली तोंड (जाती) बघून पैशाचं वाटप केलं. मात्र आतातर मजल एवढी वाढली की चक्क नेत्याचीही फसवणूक केली. हीच तर खरी मलिदा गँग. वहिनींना पाडून कोणता हेतू साध्य केला? की आता दादांच्या मागे लागलात.
आपला, गब्बर