Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजअहमदनगर जिल्हा मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; उपाध्यक्ष साहेबराव...

अहमदनगर जिल्हा मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; उपाध्यक्ष साहेबराव खामकर यांची माहिती .

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

हडपसर : अहमदनगर जिल्हा मित्र मंडळ पुणे संस्थेच्या वतीने नगर जिल्ह्यातील इयत्ता दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परिक्षेमध्ये ७५% गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच एमपीएससी व युपीएससी परिक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कुमार परिसर सहकारी गृहरचना संस्था, कोथरुड येथे रविवार (दि. २९) करण्यात आले आहे.

या दिवशी संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा असून ऊल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा गौरव देखील करण्यात येणार आहे. तसेच जे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत, त्यांनी त्यांची गुणपत्रके व्हाटस्अॅप नंबर ९६२५३४३४३४ वर पाठविण्याचे आवाहन उपाध्यक्ष साहेबराव खामकर यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असल्याचे राज्याचे माजी अप्पर आयुक्त (सहकार) व मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तसेच कार्यकारीणी सदस्य भास्करराव शेळके यांनी सांगितले. तसेच संस्थेमार्फत विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमाचे सदैव आयोजन केले जात असून गरजू विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे वसतिगृह सुरू करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments