Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजहॉटेलच्या गल्ल्यातून वडिलांनी पैसे नेल्याने मुलाने केला खून; पिंपरीतील घटना

हॉटेलच्या गल्ल्यातून वडिलांनी पैसे नेल्याने मुलाने केला खून; पिंपरीतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पिंपरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चहाच्या हॉटेलच्या गल्ल्यातून पैसे घेत असल्याने मुलाने लाकडी दांडक्याने मारून वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेरगाव येथील वनदेवनगर येथे रविवारी (दि. १) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

काळुराम महादेव भोईर (वय-५२) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी त्यांचा मुलगा प्रथमेश काळुराम भोईर (वय-२४, रा. वनदेवनगर, थेरगाव, मुळगाव आडले खुर्द, ता. मावळ) याला अटक केली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक श्वेता रणजित घोडपडे-शिंदे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश याचे वडील काळुराम हे नेहमी चहाच्या हॉटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात असत. याचाच राग आरोपी प्रथमेशला आला. या रागातूनच त्याने वडील काळुराम यांना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरात लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments