Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजहांडेवाडीत माथेफिरूने 4 चारचाकी गाड्या दिल्या पेटवून ; पावणे 3 लाखांचे नुकसान

हांडेवाडीत माथेफिरूने 4 चारचाकी गाड्या दिल्या पेटवून ; पावणे 3 लाखांचे नुकसान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर, (पुणे): ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने एका माथेफिरूने 4 चारचाकी गाड्या पेटवून दिल्याची घटना घडली आहे. ही घटना हांडेवाडी (ता. हवेली) येथील शेवाळवाडी फाटा परिसरातील नॅशनल स्क्रैप सेंटर दुकानाच्या समोर रविवारी (ता. 1) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेत 2 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी श्रीपाल रामानकलाल शहा (हांडेवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात कलम 326 (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीपाल शहा यांचे हांडेवाडी (ता. हवेली) येथील सर्व्हे नं 43/03 मध्ये नॅशनल स्क्रैप सेंटर दुकान आहे. रविवारी (ता. 1) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानाच्या समोर पार्क केलेल्या 02 गाड्यांना अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे नुकसान व्हावे. या उद्देशाने ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने आग लावली.

या आगीमध्ये आणखीन 02 गाडयाही जळाल्या. या आगीत 4 चारचाकी गाड्यांचे सुमारे 2 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments