Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजप्राण्यांना क्रूरतेची वागणूक दिल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल; न्हावरे येथील घटना

प्राण्यांना क्रूरतेची वागणूक दिल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल; न्हावरे येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रांजणगाव गणपती : प्राण्यांना न्हावरे येतून वाहतूक करून क्रूरतेची वागणूक दिल्या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलीम आजीज पठाण (रा. राहु, ता. दौंड जि. पुणे), संजय विश्वनाथ कोथंबिरे, (वय 48 वर्षे), सलिम मुस्ताक शेख, (वय 26 वर्षे), दोघे (रा. जेउर बायजाबाई, ता. जि. अहमदनगर), तालीम कासीम शेख रा. जेउर बायजाबाई, (कुरेशी मोहल्ला) ता. जि. अहमदनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम शेटीबा गायकवाड, पोलीस शिपाई, ब.न. 2633 शिरूर पोलीस स्टेशन यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 29 ऑगस्ट 2024 रोजी रात्री न्हावरा ता. शिरूर, जि. पुणे गावच्या हद्दीत न्हावरा चौकात टेम्पो क्र. एम.एच 04 जी.सी. 1506 यामधुन सलीम आजीज पठाण रा राहु, ता. दौंड जि. पुणे याच्या सांगण्यावरून संजय विश्वनाथ कोंथबिरे, (वय 48 वर्षे), सलिम मुस्ताक शेख, (वय 26 वर्षे), दोघे रा. जेउर बायजाबाई, ता. जि. अहमदनगर, तालीम कासीम शेख रा. जेउर बायजाबाई, (कुरेशी मोहल्ला) ता. जि. अहमदनगर यांनी सदर टेम्पोमधुन म्हशी कोबुंन त्यांना कोणत्याही प्रकारचा चारापाण्याची व्यवस्था न करता तसेच जनावरांची वैदयकीय तपासणी न करता वाहतुकीकरीता घेवुन चालले होते. म्हणुन या चारजणांच्या विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागणुक दिल्याप्रकरणी 1960 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments