Friday, November 22, 2024
Homeक्राईम न्यूजवाडेबोल्हाई येथे सरकारी गायरान जागेत बेकायदेशीर मुरुमाचे उत्खनन...!

वाडेबोल्हाई येथे सरकारी गायरान जागेत बेकायदेशीर मुरुमाचे उत्खनन…!

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाघोली : हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई गावच्या हद्दीतील सरकारी गायरान जमीन गट नंबर 298 मधील बेकायदेशीर झालेल्या उत्खननाची मिलिंद सुभाष भोरडे यांनी लोणी काळभोर अपर तहसिलदार तृप्ती कोलते यांच्याकडे सदरील जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी 13 ऑगस्ट रोजी लेखी तक्रार केली होती. त्यानुसार (दि. 20 ऑगस्ट) रोजी वाडेबोल्हाईचे तलाठी बाळासाहेब लाखे व पंच अशोक रंगराव भोरडे व सचिन अशोक भोरडे या दोन पंचासमक्ष सरकारी गायरान जमीन गट नंबर 298 व 303 मध्ये अनाधिकृत उत्खनन केलेल्या जागेचा पंचनामा केला. हा केलेला पंचनामा लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.

मौजे वाडेबोल्हाईचे तलाठी बाळासाहेब लाखे यांच्याकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मिलींद सुभाष भोरडे यांनी सरकारी गायरान जागेत बेकायदेशीर मुरुमाचे उत्खनन झाल्याची तक्रार तहसिलदार तृप्ती कोलते यांच्याकडे केली. त्यानुसार तहसिलदार यांनी सदरील जागेचा पंचनामा करण्याचा वाडेबोल्हाईचे तलाठी यांना आदेश दिला. त्यानुसार वाडेबोल्हाई येथील जमीन गट नं. 298 या सरकारी गायरान जमिनीवर लक्ष्मण भागुजी धूमाळ व इतर 18 जणांनी सदर गायरान गटामध्ये मुरुमाचे अंदाजे 1000 ब्रास इतके उत्खनन केलेचे दिसुन आले व त्या उत्खननाची वाहतुक झाल्याचे आढळून आले.

तसेच गावच्या ऐरणी व नंबर यांची जागा बदललेली प्रत्यक्ष दर्शनी आढळून आले. लक्ष्मण भागुजी धुमाळ व इतर 18 जणांनी त्यांच्या वाडेबोल्हाई जमीन गट नं. 303 मध्ये हि उत्खनन केल्याचे दिसुन आले. सदर गटामध्ये अंदाजे 500 ब्रास इतके उत्खनन झालेले आढळून आले. या वरील दोन्ही गटातून एकूण अंदाजे 1500 ब्रास इतके उत्खनन झाल्याचे पंचाचे मत आहे. (दि.20 ऑगस्ट) रोजी दुपारी सदरील जागेचा वस्तुस्थितीचा पंचनामा पंचा समक्ष केला.

अप्पर तहसीलदार यांच्याकडून सबंधित उत्खनन करणाऱ्यांना नोटीस निघेल. त्यानंतर संबंधितांना उत्तर द्यावे लागेल. याची केस सुरु राहून यावर कार्यवाही होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments