इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी चौकाजवळ गुरुवारी (ता. 22) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काही वेळाकरिता भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 25 हून अधिक पोलीस कर्मचारी जमा झाले होते. तसेच अग्निश्गामक दलाचे पथक व रुग्णवाहिका त्यांच्यासोबत होती. अचानक अनेक पोलिस एकाच वेळेस या परिसरात आल्याने काही काळ नागरिक ही घाबरले होते.
पोलिसांचा फौज फाटा जास्त असल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मात्र या ठिकाणी नेमक काय चाललंय हे कळेना. मात्र, थोडया वेळातच हे मॉक ड्रिल आसल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात आगामी सण-उत्सवांच्या काळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दंगा काबू योजना घेण्यात येते. लोणी काळभोर पोलिसांनी नागरिकांना बचावासाठी काही प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच उपाययोजना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट म्हणाले की, आगामी निवडणुका, सन आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी. व सर्व घटकातील नागरिकांनी कायद्याचे पालन करावे.