Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजयेरवडा परिसरात टोळक्याकडून कोयत्याने वार करून वाहनांची तोडफोड; पाच जण अटकेत

येरवडा परिसरात टोळक्याकडून कोयत्याने वार करून वाहनांची तोडफोड; पाच जण अटकेत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात पाच जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली होती. येरवडा पोलीस स्टेशन येथे, कलम 324(4), 3 (5) भादविस 4, 24 हत्यार कायदा 3, 7 क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी येरवडा पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील येरवडा परिसरात पाच जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली होती. त्यांना दि. 22 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. सदर गुन्ह्यातील अटक झल्लेयांची नावे पुढील प्रमाणे आहेत. 1) सचिन काकासाहेब कांबळे, 20 वर्षे, 2) अहद हनीफ शेख, 20वर्षे, 3) अमन मौला पिंजारी, 19 वर्षे, 4) आझर अरिफ सय्यद, 19 वर्षे व 5) इब्राहिम तैय्यब बाशोएब, 20 वर्षे, सर्व राहणार आंबेडकर नगर, येरवडा येथील आहेत. यांच्यासह घटनास्थळी जाऊन गुन्ह्याबाबत पोलिसांकडून माहिती घेऊन तपास करण्यात आला. सोबत आरोपीच्या घराची घरझडती सुद्धा घेण्यात आली आहे. अशी माहिती येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली आहे. पुढील तपस पोईस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments