Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात स्वातंत्र्य दिनादिवशी शाळेतील स्वच्छतागृहात मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

पुण्यात स्वातंत्र्य दिनादिवशी शाळेतील स्वच्छतागृहात मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील भवानी पेठेमधील एका नामांकित शाळेमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत आलेल्या ११ वर्षीय मुलीला एकटे गाठत जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढून नेत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना १५ ऑगस्ट रोजी घडली आहे.

देवराज पदम आग्री (वय-१९, रा. न्यू मोदी खाना, लष्कर) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या ३० वर्षीय आईने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भवानी पेठ परिसरात एक नामांकित शाळा आहे. या शाळेत पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. दरम्यान, पिडीत मुलगी १५ ऑगस्टच्या दिवशी शाळेतील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. हा कार्यक्रम संपल्यानंतर ती दुसऱ्या मजल्यावर तिची स्कूल बॅग शोधण्यासाठी निघाली होती.

यावेळी आरोपी मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ उभा होता. त्याने पीडित मुलगी जवळ येताच तिचा जबरदस्तीने हात पकडून तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत नेले. यावेळी आरोपी तरुणाने तिच्याशी अश्लील कृत्य करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. पीडित अल्पवयीन मुलीने आपली सुटका केली. घरी गेल्यानंतर तिने आपल्या आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. पूढील तपास उपनिरीक्षक माने करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments