इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, (पुणे) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डी.एन.ई.136) पुणे जिल्हाध्यक्षपदी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अमोल महादेव घोळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारणी सभेची नुकतीच सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अमोल घोळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यापूर्वीचे मावळते अध्यक्ष श्रीकांत वाव्हळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सदर निवडणुक प्रक्रिया पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियनचे कार्यालय शिवलिला चेंबर, सदाशिव पेठ, कुमठेकर रोड, पुणे या ठिकाणी पार पडली. निवडणुक सभे करिता निवडणुक निरीक्षक म्हणुन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या विभागीय महिला संघटक सुप्रिया सांडभोर व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, जिल्हा सरचिटणीस अनिल बगाटे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
सदर सभे करिता महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन राज्य घटना समितीचे अध्यक्ष अनिल कुंभार, बाळासाहेब गावडे, माजी अध्यक्ष श्रीकांत वाव्हळ, संदीप ठवाळ, संतोष भोसले, निलेश पांडे, शरद ढोले, तुळशीराम रायकर, मच्छिंद्र आटोळे, कैलास कारंडे, नवनाथ झोळ, पद्माकर डोंबाळे, चंद्रकांत कुलकर्णी, पुंडलिक म्हस्के, हनुमंत भंडलकर, अस्मिता चव्हाण, सुरेखा कुडाळ, मच्छिंद्र निगडे, नितीन ढुके, मदन शेलार, दिपक बोरावके, निलेश लव्हटे, मंगेश जोशी, अभय निकम, विजय कुलकर्णी, प्रल्हाद पवार, सविता भुजबळ, सचिन पवार, मारुती दुराफे, विरेंद्र गवारे, शंकर ढोरे, गोपीनाथ खोमणे, विजय अडसुळ, जयवंत मेंगडे, रोहिदास अभंग, विश्वनाथ खंडाळे, राजाराम रासकर, संतोष गायकवाड, श्रीनिवास माने, तुषार काशिद, सुरेश घनवट इत्यादी तालुका अध्यक्ष, सचिव उपस्थित होते.
दरम्यान, युनियन पतसंस्थेचे आजी माजी पदाधिकारी महेंद्र बेंगारे, संतोष नेवसे, देवदत्त सांडभोर, विनोद दुधाळ, विलास बडदे, कानिफनाथ थोरात, सतिश बोरावके, पी.टी. पवार, सदानंद फडतरे, प्रदिप तांबे, मोरेश्वर गाडे, दयानंद कोळी, सोमा थोरात, इम्तियाज इनामदार, चेतन वाव्हळ, धीरज घोटाळे, आकाश सावंत, मारुती घोळवे, आनंद होळकर, महेश खाडे, रावबा गौंड, पुनम गायकवाड, महादेव नगरे, संजय चव्हाण, नागनाथ गर्जे, अनिल खळदकर, शशिकांत तिडके इत्यादी उपस्थित सर्व सभासद हजर होते.
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष घोळवे म्हणाले, “ग्रामसेवक युनियनच्या प्रमुख प्रलंबित मागण्या पैकी पंचायत विकास अधिकारी, 10, 20, 30 अश्वासित योजना, सेवा विषयक बाबी, जुनी पेन्शन योजना, ग्रामसेवकांवरील अतिरिक्त कामे, आदर्श ग्रामसेवक वेतन वाढी, प्रलंबित मेडीकल बिले, वेतन त्रुटी इत्यादी कामे सोडविण्यासाठी प्रामुख्याने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.