Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजबारामतीतून लढण्यास मला रस नाही; जय पवारांच्या उमेदवारीवर अजित पवारांनी दिले स्पष्ट...

बारामतीतून लढण्यास मला रस नाही; जय पवारांच्या उमेदवारीवर अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : “जय पवार यांच्या उमेदवारीची मागणी केली जात आहे. त्यांना उमेदवारी देणार का?” असा प्रश्न माध्यमांकडून विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार म्हणाले.,” शेवटी लोकशाही आहे. मीही बारामतीमधून सात ते आठ वेळा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे मला आता तिथून लढण्यास फार रस नाही. जय पवारसंदर्भात जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदीय मंडळ निर्णय घेतील. जनता, कार्यकर्ते आणि पार्लमेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.”

विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार रिंगणात उतरतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत अजित पवार यांनी गुरुवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले.

दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांनी नुकतीच एक शंका उपस्थित केली होती. लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी देण्यासाठी दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत अजितदादांवर असल्याची चर्चा आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बारामतीत जय पवार यांना उमेदवारी देऊन अजित पवार हे स्वत : कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार का, हेच बघणं आता महत्त्वाचं ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments